जनतेज न्युज

15 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जावू, टॅक्सी चालक संघटनांचा इशारा

प्रतिनिधी, मुंबई : मुंबईकरांच्या परिवहन संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. परिवहनाचा एक भाग असलेले टॅक्सी संघटनांनी बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे परिणामी यात मुंबईकरांची कोंडी होण्याची दाट शक्यता आहे.
मागील काही महिन्यात सीएनजीचे दर अनेकदा वाढले आहेत. त्या तुलनेत भाड्याच्या दरात वाढ झालेली नाही. त्यामुळे टॅक्सीचालकांना दररोज 250 ते 300 रुपये अशा नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
टॅक्सी च्या भाडेदरात वाढ झाली पाहिजे आणि कमिटीच्या माप दंडानुसार सुधारित भाडेदर अमलात आले पाहिजेत अशी मागणी टॅक्सी संघटना करत आहेत. मागण्यांची पूर्तता न झाल्यास 15 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा टॅक्सी संघटनांनी दिला आहे. असे झाल्यास मुंबईकरांचे नक्कीच हाल होणार आहेत.