जनतेज न्युज

15 आणि 16 मार्चला बँका राहणार बंद !

प्रतिनिधी , अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच चालू वर्षाचा अर्थसंकल्प मांडला या अर्थसंकल्पामध्ये बँकांचे खासगीकरण करण्याचे संकेत त्यांनी दिले त्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडिया या आघाडीच्या बँकांचा समावेश करण्यात येणार असल्याने युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन संघटनेने या निर्णयाचा तीव्र विरोध करत दोन दिवस 15 आणि 16 मार्च रोजी बँका बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान याबाबत युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनचे सोलापूर जिल्हा समन्वयक सुहास मार्डीकर यांनी अधिक माहिती देताना सरकारच्या या चुकीच्या धोरणाविरुद्ध बंद पुकारत असल्याचे सांगितले यावेळी अशोक इंदापुरे अजय बागेवाडी प्रसाद अब्दुलपुरकर सुहास जाधव सचिन काळे गजानन औसेकर महेश नानकांनी संतोष गायकवाड आदींसह संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते..