जनतेज न्युज

वाझेंना अटक म्हणजे महाविकास आघाडीच्या एका वर्षाच्या कारकीर्दीचा काळा अध्याय – अतुल भातखळकर

प्रतिनिधी ,मुंबई:- सचिन वाझेंना अटक म्हणजे महाविकास आघाडी सरकाच्या एका वर्षाच्या कारकीर्दीतला सगळ्यात मोठा काळा अध्याय आहे अशी जहरी टीका भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

तसेच सचिन वाझे यांचे कोणत्या राजकीय नेत्यांशी संबंध होते, कोणत्या आमदारांशी संबंध होते. पोलिस दलातील कोणत्या अधिकाऱ्यांशी त्यांचे संबंध होते. याची कसून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्याबरोबरच खंडणीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झालेला असतांना त्यांना मुख्यमंत्र्यांनी परत सेवेत का घेतलं. याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे. अशा मागण्या त्यांनी केल्या.