जनतेज न्युज

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अखेर अटक करण्यात आली आहे.

प्रतिनिधी , मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) ही कारवाई केली आहे. एनआयएने सचिन वाझे यांची शनिवारी दिवसभर कसून चौकशी केली. त्यानंतर रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी त्यांना अटक केली आहे. आता या प्रकरणात सचिन वाझे यांनी मेडीकल टेस्ट करुन आण्यात आले आहे.