प्रतिनिधी , पुणे : शेवाळवाडी येथे दोन मैत्रीणींने आत्महत्या केली आहे . हा धक्कादायक प्रकार ( ता . १३ ) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला आहे . आकांक्षा औदुंबर गायकवाड ( वय १ ९ ) व सानिका हरिश्चंद्र भागवत ( वय १ ९ ) अशी आत्महत्या केलेल्या तरूणींची नावे आहेत . आत्महत्येचे कारण समजलेले नाही . या दोन्ही तरुणींपैकी एकीने गळफास लावून तर दुसरीने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली . या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे . गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ अभिनंदन क्रिस्टल टॉवर या इमारतीमध्ये सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला आहे . स्थानिक रहिवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार आकांक्षा व सानिका या दोघीही मैत्रिणी होत्या . पाच वाजण्याच्या सुमारास सानिका हिने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली . या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले . रुग्णवाहिकेतून सानिकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जात असताना आकांक्षाने पहिले . याचवेळी आकांक्षाने पाचव्या मजल्यावरून रुग्णवाहिकेजवळ उडी मारली . त्यातच तिचा जागीच मृत्यू झाला . सानिकाने सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अभिनंदन इमारतीमधील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली . आकांक्षाला हे समजल्यावर ती सानिकाच्या घरी गेली होती . या घटनेचा धक्का सहन न झाल्याने तीनेही याच इमारतीच्या टेरेसवरून सायंकाळी सातच्या सुमारास उडी मारून आत्महत्या केली . दोघींच्याही आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत .
