प्रतिनिधी , औरंगाबाद : प्रथमच औरंगाबाद महानगरपालिका शाळेच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य बाल नाट्य स्पर्धेत सहभागी होत धनंजय सरदेशपांडे लिखित ‘चमचम चमको’ या नाटकाचे आत्मविश्वासाने सादरीकरण केले. आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये मुलांनी प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा करत यश मिळवावं..आणि जर मुलांना अपयश मिळाले तर ते पालकांना पचवता येत नाही..इतरांना मिळालेल्या यशाची तुलना आपल्या मुलांसोबत करत स्वतःच्या मुलांमध्ये असलेल्या कलेचे पंख छाटून त्याजागी पालक आपल्या इच्छा लादतात. कायम तुलना करून मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होतोअशा वातावरणात मुलांचे पालन पोषण पालकांनी स्थिर राहून करावे असा या नाटकातून संदेश मिळत आहे. बालनाट्याची निर्मिती मनपा शिक्षणाधिकारी संजीव सोनार यांनी केली, दिग्दर्शन,मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा महाजन यांनी केले नेपथ्य , श्री प्रसाद मोगरेकर आणि तेजस्विनी देसले. प्रकाश योजना – श्री स्वप्निल पवार ,श्रीमती संगीता चौधरी , संगीत – श्री गिरीश देशमुख आणि प्रकाश इंगळे सर
रंगभूषा व वेशभूषा – अनुजा हरकत, श्रीमती पवार किरण ,बालनाट्य मध्ये सहभागी विद्यार्थी ,(सुमा)सोनाली यादव, (ईशा) रूपाली गोसावी,(उषा)प्रीती कांबळे ,(सायली ) सयमा शेख (डॉक्टर)फरीन पठाण (डायरेक्टर)गौरव देशमुख (गायक)धीरज बर्गे,(नृत्य शिक्षक)रोहन इंगोले हे होते.मनपा शिक्षणाधिकारी संजीव सोनार यांनी सांगितले की विद्यार्थी हा सर्वगुणसंपन्न झाला पाहिजे करिता मनपा च्या विविध शाळेतील विद्यार्थ्यांना शहरांमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या ,नृत्य, नाट्यकला, चित्रकला, या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी वाव मिळवून देण्यात येत आहे.
