जनतेज न्युज

साताऱ्यातील औंधच्या यमाईदेवीची यात्रा मोठ्या उत्सात साजरी ; भाविकांनी गर्दी

प्रतिनिधी , सातारा : उभ्या महाराष्ट्राचे शक्तीपीठ असलेले सातारच्या यमाई देवीची यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये पार पडली. यावेळी महाराष्ट्र सह कर्नाटक आंध्र उत्तर प्रदेश येथून आलेल्या लाखो भाविकांनी यमाई देवीच्या रथाचे दर्शन घेऊन रथावर गुलाल खोबऱ्याची उधळण केली. शाकंभरी पौर्णिमेच्या रात्री यमाई देवीच्या गावातील मंदिरासमोरील सर्वात मोठी दीपमाळ प्रज्वलित करून देवीच्या यात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी रात्री औंध पंचक्रोशीतून यमाई देवीचा छबिना देखील काढण्यात आला. तर पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी यमाई देवीचे रथातून वाजत गाजत मिरवणूक काढून यंदाची यमाई देवीची मुख्य यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोना आजारानंतर संपन्न होत असलेल्या औंधच्या यमाई देवी यात्रेसाठी महाराष्ट्र सह कर्नाटक,आंध्र,उत्तर प्रदेश या परिसरातील लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी औंध नगरीमध्ये दाखल झाले होते. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सातारा पोलिसांनी यात्रेदरम्यान चोख बंदोबस्त ठेवला होता.