जनतेज न्युज

सन १९९६ चे वर्ल्डकप विजेते श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जुना रणतुंगा यांचे ठाणे शहरात स्वागत

प्रतिनिधी, ठाणे : सन १९९६ चे वर्ल्डकप विजेते, श्रीलंकेचे माजी कर्णधार श्री.अर्जुना रणतुंगा हे आमदार श्री. प्रताप सरनाईक यांच्या विनंतीवरून ओवळा-माजिवडा मतदारसंघातील विविध विकास प्रकल्पांची व क्रिकेटच्या मैदानांची पाहणी करण्याकरिता आज मंगळवार दि. २३ मे, २०२३ रोजी ठाणे शहरामध्ये आले. यावेळी युवासेना नेते श्री. पुर्वेश सरनाईक व मुंबई क्रिकेट लीगचे चेअरमन श्री. विहंग सरनाईक यांच्या उपस्थित लोकमान्यनगर येथील स्व.रामचंद्र ठाकुर तरण तलावाच्या ठिकाणी आमदार श्री.प्रताप सरनाईक यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेली व्यायामशाळा व त्यामधील साहित्याचे लोकार्पणाचा कार्यक्रम श्रीलंकन माजी कर्णधार श्री. अर्जुना रणतुंगा यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आमदार श्री. प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठूरायाची मूर्ती व शाल देऊन श्री. अर्जुना रणतुंगा यांचे स्वागत केले.- सदर कार्यक्रमामध्ये श्री. अर्जुना रणतुंगा यांनी भाषण करताना सांगितले कि, मी ही एक सर्वसामान्य कुटुंबातून आलो असून जर सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना सुसज्य अश्या सुविधा मिळाल्या तर  यांच्यातूनच भविष्यात गावस्कर व तेंडुलकर सारखे खेळाडू निर्माण होतील. त्याचप्रमाणे यावेळी गरीब व गरजू क्रीडापट्टूना मोफत क्रिकेट साहित्याचे वाटप श्रीलंकन माजी कर्णधार. अर्जुना रणतुंगा यांच्या हस्ते करण्यात आले.सुसज्य असे जिम उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच श्रीलंकन माजी कर्णधार श्री.अर्जुना रणतुंगा यांची भेट झाल्याबद्दल तरुणांनी व  क्रीडापट्टूनी आमदार श्री. प्रताप सरनाईक यांचे आभार मानले.