प्रतिनिधी, धुळे : एलआयसी किंग राजेंद्र बंब याला अवैध्य सावकारी प्रकरणी गुन्हा दाखलअटक करण्यात आली.त्यात त्याच्याकडून avaidhya मार्गाने जमवलेली मोठी रोकड सह सोने,चांदी,विदेशी चालणे,खरेदी खते, फिक्स डॉपोजीट पावत्या,असा मोठा मुद्देमाल हस्तगत केला, त्यानंतर अवैध सावकारीचा धंदा करणाऱ्यांविरुध्द तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन धुळे जिल्हा पोलिसांनी केले होते. त्यानंतर धुळे जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात राजेंद्र बंब यांच्यावर 3 गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर आता धुळे शहरातील ट्रव्हल्स मालकाला 2 लाख व्याजाने देवून त्याच्याकडून तब्बल 22 लाख रुपये वसूल करून पुन्हा 11 लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांविरूध्द धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसनी दिलेल्या माहिती नुसार, धुळे शहरातील झाशी राणी पुतळ्याजवळील प्रबोधनकार ठाकरे संकुलातील साईराज टुर्स ऍण्ड ट्रॅव्हल्सचे संचालक निलेश श्रीराम पवार यांनी व्यावसायात अडचणी निर्माण झाल्याने व्यापार्यांना व्याजाने पैसे देणारे गणेश बागुल यांच्या कडून 2 लाख रूपये व्याजाने घेतले. बरीचशी परतफेड झाल्यानंतरही निलेश हराळ व वाल्मिक हराळ यांनी जास्त व्याज आकारत दुकान नावावर करून घेतले. दुकान परत मिळण्यासाठी पुन्हा 11 लाख रूपयांची खंडणी मागितल्याने धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साईराज टुर्स ऍण्ड ट्रॅव्हल्सचे संचालक निलेश पवार यांनी व्यवसायासाठी गणेश बागुल यांच्याकडून व्याजाने 2 लाख रूपये 2 फेब्रुवारी 2016 रोजी 10 टक्के व्याजदाराने घेतले. त्यानंतर त्यांनी लाखो रुपयांची परतफेड केली. उर्वरित पैशांसाठी गणेश बागुल यांनी तगादा लावला कुटुंबातील लोकांना शिवीगाळ तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देत होता. त्यावेळी निलेश पांडुरंग हराळ याच्याकडून निलेश पवार 2 लाख रूपये व्याजाने घेतले. त्यानंतर पवार यांच्या ट्रॅव्हल्सचा अपघात झाल्याने गणेश बागुल व निलेश हराळ यांना पैसे देणे अशक्य झाले नाही. त्यावेळी गणेश हरळ याने स्विफ्ट कार MH 18 AJ 2256 दमदाटी करून नेली. दरम्यान दुकानाच्या कागदपत्र घेवून बागुल व हराळ यांनी नावावर करून घेतले. दुकानाचे कागदपत्रे परत तुमच्या नावावर करायचे असतील तर 11 लाख रूपये दे अशी मागणी केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात निलेश पवार यांनी तक्रार दाखल केली असून दिवाणी न्यायालयातही दावा दाखल केला आहे.
2 लाखांच्या कर्जापोटी वेळोवेळी शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याने धुळे शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 385 387, 323, 504 ,506 ,34 सह महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014 चे कलम 39 प्रमाणे गणेश रमेश बागुल, निलेश पांडुरंग हराळ व वाल्मिक हराळ यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास धुळे शहर पोलीस करीत आहेत.
