प्रतिनिधी, अमरावती : अमरावती शहरांमधील प्रसिध्द उद्योजक व दानशूर समाजसेवी अशी ओळख असलेले संकल्प बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष नितीन कदम यांच्या पुढाकारातून बेरोजगार युवकांना रोजगारासाठी चारचाकी हातगाडी, व्यवसायासाठी भांडवल व अत्यावश्यक साहित्य वाटपाचा संकल्प जनाधार सोहळा आज घेण्यात आला,संकल्प बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यालया समोर अगदी सादेपणाने हा सोहळा पार पडला या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ठ म्हणजे या सोहळ्यात कोणत्याच राजकीय पक्षाच्या नेत्याला आमंत्रण देण्यात आले नव्हते,केवळ बेरोजगार आणि नितीन कदम यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.बेरोजगार गरजू युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यादृष्टीने २०० चारचाकी हातगाडी सह त्या गाडीवर माल भरून वाटप करण्यात आले सर्व गाड्यांची पूजा केल्यानंतर सर्व बेरोजगार युवकांना ह्या गाड्या त्यांच्या सुपूर्त करण्यात आल्या.
