जनतेज न्युज

200 किलो गव्हाचा वापर करून सात फुटाची आकर्षक व सुबक गणेश मूर्ती

प्रतिनिधी, पुणे : पंढरपूर , पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयाजवळ असणाऱ्या व्यास नारायण नगर मधील कै. मनोज दादा परचंडे मित्र मंडळाच्या वतीने 200 किलो गव्हापासून गणेश मूर्ती तयार केली आहे. विशेष म्हणजे विसर्जनानंतर या मूर्तीवरील गहू काढून हे मंडळ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना पेरणीसाठी वाटणार आहे. गणेशोत्सव हा वेगवेगळ्या माध्यमातून साजरा केला जातो पंढरपुरातही सध्या गणेशोत्सवाचा उत्साह दिसत आहे अशातच पर्यावरण पूरक गणेश मूर्ती ही व्यास नारायण नगर मध्ये तयार करण्यात आली. 200 किलो गव्हाचा वापर करून सात फुटाची आकर्षक व सुबक गणेश मूर्ती तयार झाली आहे महत्वाचे म्हणजे मंडळातील कार्यकर्त्यांनीच 26 दिवसाच्या परिश्रमातून ही गणेशमूर्ती तयार केली यंदा गणेश मूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर या मूर्तीवरील गहू काढून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना पेरणीसाठी देण्यात येण्याचा आदर्शवत निर्णय या मंडळांनी घेतला आहे त्यामुळे निश्चितच हे मंडळ आणि 200 किलो गव्हापासून तयार झालेली गणेश मूर्ती सध्या पंढरपूर मध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.