जनतेज न्युज

2024 साली रायगडावर होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्या संदर्भात डॉ.संदीप महिंद यांनी घेतली उदयनराजेंची भेट.

प्रतिनिधी , २०२४ मध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छ.शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पुर्ण होत आहेत.त्या अनुशंगाने किल्ले रायगडावर ३५० वा वर्धापनदिन अत्यंत उत्साहात साजरा होणार आहे.या कार्यक्रमाला भारतभरातून किमान दोन लाख अमराठी शिवभक्त यावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत.हा सोहळा छत्रपती घराणाचे १३ वे वशंज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली आणि राष्ट्रपती,पंतप्रधान आणि सर्व राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित पार पडणार आहे.या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आज साताऱ्यात डॉ.संदीप महिंद यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन चर्चा केली.