जनतेज न्युज

२४ हजार लिटरचा पेट्रोल टँकर पेटला, अग्निशामक दलामुळे मोठी दुर्घटना टळली

प्रतिनिधी, सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी जवळील इंडियन ऑइलच्या डेपोतून एकूण २४ हजार लिटर पेट्रोल आणि डिझेल घेउन टँकर निघाला होता. तो टँकर सोलापूरच्या दिशेने फ्लाय ओव्हेर पुलादरम्यान सर्व्हिसरोड वरून जात असताना अचानक टँकर चालकाच्या केबिनला आग लागली. टँकर चालकाने अगीचा अंदाज घेत गाडी थांबावली आणि टँकर बाहेर पडला. क्षणार्धाथ पूर्ण केबिन पेटले. त्यामुळे संपूर्ण परिसरात कांही काळ भीतीचे वातावरण ही पसरले होते.
याची माहिती अग्निशामक दलाला मिळतास अग्निशामक दलाचे जेवण घटनास्थळी दाखल झाले आणि मोठा अनर्थ होण्यापासून वाचला.