जनतेज न्युज

कल्याण ग्रामीण भागात पावसाची संततधार; टिटवाळा नजिक रुंदे नदीचा पुल पाण्याखाली

प्रतिनिधी, कल्याण : कालपासून संततधार सुरु असलेल्या पावसामुळे कल्याण टिटवाळा नजीक रुंदे नदीवर असलेला पूल संपूर्णतः पाण्याखाली गेला .पुलावरून दोन फूट पाणी वाहत आहे .त्यामुळे पुलावरील वाहतूक बंद करन्यात आली आहे . एन डी आर एफ च्या पथकाने या परिसराची पाहणी केली .दरम्यान या परिसरात असलेल्या गावामधील नागरिकांनी या पुलावरून जाऊ नये जवळच असलेल्या खडवली येथील पर्यायी पुलावरून ये जा करावी असे आवाहन तहसिलदार जयराज देशमुख यांनी केलं आहे.