जनतेज न्युज

प्राध्यापक महिलेची लाईट बिल भरण्याच्या नावाखाली ऑनलाईन दोन लाख रुपयांची फसवणूक

प्रतिनिधी, जालना : सायबर सेल आणि पोलिसांच्या वतीने वारंवार नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी वेगवेगळे फंडे वापरतात. वेगवेगळे मेसेज आणि लिंक पाठवून फसवणूक करतात. अलिकडे वीज बिल भरणा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोबाइल ॲपचा उपयोग करत असल्याची घटना उघडकीस समोर आली आहे. बिल भरण्यासाठी ॲप डाऊनलोड करताच खात्यातील पैसे परस्पर काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. याविषयी सायबर सेल कडून वारंवार नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन यांनी अशा ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवाहन केले आहे.