जनतेज न्युज

25 फेब्रुवारी ते 7 मार्च सोलापूर शहर जिल्हात रात्र संचारबंदी तर 10 वी, 12 वी वगळता शाळा-महाविद्यालये ही राहणार बंद – पालकमंत्री

प्रतिनिधी , सोलापूर : सोलापूर शहर जिल्ह्यात उद्यापासून रात्र संचारबंदी लागू करण्याचा निर्णय पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर केला आहे.
25 फेब्रुवारी पासून रात्री 11 ते 5 वाजेपर्यंत संचारबंदी ची घोषणा करण्यात आली आहे.
7 मार्च पर्यंत ही संचारबंदी असून शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय देखील पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर केलाय.
पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सोलापूर जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतली या बैठकीनंतर त्यांनी 25 फेब्रुवारी ते 7 मार्च पर्यंत संचारबंदी जाहीर केली आहे.
10 आणि 12 वी वगळता शाळा महाविद्यालये बंद राहणार आहेत.
तसेच कर्नाटक राज्यातून सोलापूर शहर जिल्हात दाखल होण्यासाठी कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे
तशी घोषणा देखील पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे.