प्रतिनिधी , जळगाव : नवीन वर्षाचे स्वागत करतांना कोरोनाच्या आपत्तीमुळे महाराष्ट्र राज्य शासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले आहे. रात्रीच्या संचारबंदीच्या पार्श्वभूमिवर, आजपासून जिल्हाभरात नाकाबंदी करण्यात येत असून यात विशेष करून 31 तारखेला ड्रंक अँड ड्राईव्ह करणार्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
