प्रतिनिधी , बीड : दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर यंदा नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात होताना दिसत आहे. बीडमध्ये शिवसंग्रामच्या वतीने दरवर्षीप्रमाणे व्यसनमुक्तीचा कार्यक्रम घेण्यात येतोय. आमदार विनायक मेटे यांच्या निधनानंतर ज्योती मेटे आणि रामहरी मेटे यांच्या नेतृत्वात यंदा हा पहिलाच कार्यक्रम होतोय. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गिरीश महाजन, पालकमंत्री अतुल सावे यांची उपस्थिती राहणार आहे. 31 डिसेंबर रोजी सकाळी व्यसनमुक्ती रॅली निघेल त्यानंतर रात्री संगीत रजनीचा कार्यक्रम होणार आहे. नववर्षाच्या सुरुवातीला मसाला दुधाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
