प्रतिनिधी , नाशिक : पारंपारिक शेतीला पर्याय म्हणून सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी येथील शेतकऱ्याने खेकडा पालनासाठी व्यवसाय करून याद्वारे भरघोस उत्पन्न मिळवत आहे.वडिलोपार्जित शेतातील पाच गुंठ्यात त्यांनी दहा टन क्षमतेचा खेकडा पालनाचा प्रयोग यशस्वी केलायं. सिन्नरच्या कहांडळवाडी येथील शेतीचं गणीत पावसाळ्यातील निसर्गाच्या भरवश्यावर अवलंबून आहे. पारंपारिक शेतीला पर्याय म्हणून इथल्या दत्तात्रय चांगदेव नाठे या तरुणाने खवय्यांसाठी खेकडा पालनासाठी गुंतवणूक केली. वडिलोपार्जित शेतातील पाच गुंठ्यात त्यांनी दहा टन क्षमतेचा प्रयोग यशस्वी केलायं. त्यांच्या खेकड्याला जागेवर चारशे रुपयांचा भाव मिळतोय.सिन्नरच्या वावी, तळेगाव,रस्त्यालगत असलेल्या कहांडळवाडी गावातील शेतात पाच गुंठ्यावर नाठे यांनी दहा फूट खोलीचा सिमेंट काँक्रीटचे बांधकाम असलेला भूमीगत हौद बांधला.त्यात विहीर खोदताना निघालेला दगड-मातीचा मलबा, शेतातील मुरूम-माती भरून घेतली. खेकडा पालनासाठी हौदामध्ये पाण्यापेक्षा चिखल महत्त्वाचा असल्याने ही व्यवस्था पूर्ण झाल्यावर चारीबाजूने लोखंडी तारांचे संरक्षक कुंपण करण्यात आले. पक्षांनी प्रवेश करू नये यासाठी संपूर्ण पाच गुंठे क्षेत्राला जाळीचे आच्छादन करण्यात आले आहे.
