जनतेज न्युज

६ जानेवारी रोजी लोकनियुक्त सरपंचाच्या अध्यक्षतेखाली उप सरपंचाची होणार निवड

प्रतिनिधी , बुलडाणा : : बुलढाणा जिल्ह्यात २७९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत.आणि त्यानंतर आता ६ जानेवारी रोजी उपसरपंचाची निवड केली जाणार आहे. या दिवशी लोकनियुक्त सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत ची पहिली सभा आयोजित करून त्यामध्ये उपसरपंच पदाची निवडणूक घेण्याचे निवडणूक विभागाने निश्चित केले आहे.
थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाला उपसरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार तर आहेच, शिवाय उपसरपंचपदाकरिता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना समान मते पडल्यास एक निर्णायक मत देण्याचा अधिकार बहाल करण्यात आला आहे.