जनतेज न्युज

मागासवर्गीय अहवालाचे संपुर्ण भाषांतर सरकारने इंग्रजीमध्ये का केला नाही. छत्रपती संभाजी राजे यांचा सरकारला सवाल

प्रतिनिधी , मराठा आरक्षणावर येत्या ८ मार्च ते १८ मार्च दरम्यान सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे यावेळी तरी सरकारने एकदिलाने सामोरे जावे असे अवाहन छत्रपती संभाजी राजे यांनी केले आहे. वाशी येथे मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची चिंतन बैठक पार पडली. बैठकीला छत्रपती संभाजी राजे उपस्थित होते. राज्य सरकार कडून मागास आयोगाचा संपुर्ण अहवाल वरिष्ठ वकिलांना आभ्यासासाठी भाषांतरीत करून दिला नसल्याचा आरोप संभाजी राजे यांनी केलाय. मागासवर्गीय आयोग भाषांतरीत केला असता तर आभ्यास करणे सोपे गेले असते. मात्र यामध्येही सरकारचा हलगर्जीपणा दिसून येत असल्याचा आरोप संभाजीराजे यांनी केलाय. मराठा समाजाकडून सरकारच्या मदतीसाठी दोन वरिष्ठ वकील दिले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान राज्य सरकारने सारथी संस्था आणि आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळासाठी जाहिर केलेला निधी त्वरीत द्यावा अशी मारणीही संभाजी राजे यांनी केली आहे .