जनतेज न्युज

पनवेल मध्ये भाजपला खिंडार पडणे सुरु झालं आहे.

प्रतिनिधी , पनवेल : नगर परिषद मा.उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांनी पक्ष सोडताना भाजप पक्षाचे सर्वेसर्वा रामशेठ ठाकूर आणि स्थानिक नेतृत्वावर जोरदार टीका केली.
पनवेल भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता असताना स्थानी नेत्यांमध्ये वादविवाद होताना दिसत आहे. त्याच्या त्या वादविवादा मुळे गणेश पाटील यांनी भाजप ला सोड चिठ्ठी देऊन शेतकरी कामगार पक्षात प्रवेश
केला. गणेश पाटील यांच जोरदार स्वागत करण्यात आले.पेण विधानसभा मा. आमदार धर्यशील पाटील आणि जे एम म्हात्रे यांनी शेतकरी कामगार पक्षात स्वागत केले.
यावेळी पनवेल पंचायत समिती सभापती काशिनाथ पाटील, चिटणीस नारायण घरत,विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे,नगरसेवक,नगरसेविका आदी मान्यवर आणि मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश करणारे कार्यकर्ते उपस्थित होते.