प्रतिनिधी , राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज सकाळी 11 वाजता अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रात जाऊन लस घेतली.. सध्या अमरावतीसह राज्यात कोरोना लस घेण्यासाठी सर्वच पुढाकार घेत आहे.. आता मंत्री सुद्धा स्वतः पुढाकार घेत लस घेताय.. मंत्री यशोमती ठाकूर ह्या आजच सकाळी मुंबई वरून अमरावती दाखल झाले आणि लगेच त्या स्वतः जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर लस घेतली यावेळी आमदार बळवंत वानखडे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध देशमुख यांनीही लस घेतली यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्यामसुंदर निकम हजर होते. यावेळी जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना ची लस घ्यावी असे आव्हान देखील यशोमती ठाकूर यांनी केले बाईट :-यशोमती ठाकूर महिला व बाल कल्याण मंत्री
