प्रतिनिधी , अंबरनाथ पूर्वेकडिल आनंदनगर एमआयडीसीमधील प्लॉट नंबर 40 येथील आर के बेकवेलमार्स नावाच्या बिस्कीट कंपनीला आज सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली . या कंपनीत बिस्कीट बनवले जातात .आग लागल्याचे कळताच सुरक्षा रक्षकाने याबाबत अग्निशमन विभागाला माहिती दिली .काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण कंपनीला वेढा घातला होता . आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु केले .अंबरनाथ बदलापूर अग्निशमन विभागाच्या सात गाड्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात काम करत होते .तब्बल तीन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाला यश आलं .आगीच कारन अद्याप अस्पष्ट असून शॉर्ट सर्किट मुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे . महावशिव रात्री निमित्त कंपनी बंद असल्याने कंपनीत कर्मचारी नव्हते त्यामुळे सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नसली तरी कंपनिमधील माल जळून खाक झाला असून कंपनीच मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय .
