प्रतिनिधी , यवतमाळ : कधी काळी स्वच्छ व सुंदर असलेले यवतमाळ शहर आता कचऱ्यामुळे विद्रुप झाले आहे. राज्य स्तरावर स्वच्छता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मात्र हा आता भुतकाळ झाला आहे.
नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कचरा गोळा केला जात नाही, त्यामुळे तसाच साचून राहतो, सफाई कामगारांच्या समस्या निकाली काढण्यात आल्या नाही. कचरा गोळा करण्याचा ठेका तात्काळ देण्याच्या मागणीसाठी नगरसेवकांनी उपोषण सुरू केले आहे.
