प्रतिनिधी , पुणे जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर येथे आज मध्यरात्री १२ वाजता पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांच्या हस्ते शासकीय महापुजा होऊन महाशिवरात्र उत्सव सोहळा संपन्न झाला. कोरोणा मुळे यंदा मंदिर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली असून तीन दिवसांचा यात्रा उत्सव ही रद्द करण्यात आला असून शासकीय महापूजेनंतर मंदिर बंद करण्यात आले असुन भाविकांनी भिमाशंकर मंदिर येथे दर्शनासाठी येवू नये आसे आव्हान प्रशासना तर्फे करण्यात आले आहे.
सह्याद्री पर्वत रांगांच्या कुशीत वसलेलं भिमाशंकर हिरव्यागार वातावरण, थंडीची चाहुल,त्यातुन दिवसभर कडाक्याचे ऊन अशातच शिवभक्तीच्या गजरात मंदिर परिसर रात्रीच्या अंधारात विद्युत रोषणाईने उजळून गेला आहे. रंगीबेरंगी फुलांच्या माळानी मंदिर परिसर सुशोभित करण्यात आला
