जनतेज न्युज

पोलीस पाटलाला मारहाण करणारा आरोपीला अटक

पोलीस पाटील यांच्या स्वरक्षणार्थ भादवि 353 कलमा अंतर्गत गुन्हा दाखल
प्रतिनिधी , आमगाव : आमगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणारा किडंगिपार गावातिल पोलीस पाटील देवेंद्र भांडारकर हे गावातीलच एका व्यक्तीचे भांडण झाले असुन भंडन सोडवायला गेले असता आरोपींनि पोलीस पाटलांस मारहाण केली असता तक्रार दाखल होताच आरोपीला अटक करण्यात आली आहे
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या किडांगीपर येथिल पोलिस पाटील देवेंद्र भांडारकर यांना शेजारच्या राधेश्याम वंजारी यांनी त्यांच्या पत्नी अर्चना वंजारी सी आरोपी इंद्रराज मेंढे भांडण करीत आहेत आपण जाऊन भांडण सोडविण्याची विन्नती फोन द्वारा केली असता । पोलीस पाटील हे लोकसेवक म्हणून त्यांच्या घरी भांडन सोडविण्यासाठी गेले असता आरोपीने उलट पोलिस पाटीलास तुझं काय काम, तू कसला आलास म्हणून पोलीस पाटील यास कालर पकडून मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली। असता पोलीस पाटलाने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली असुन पोलिसांनी तक्रारीवरून आरोपी विरोधात भादवी 353 ,504,506 अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस 15 मार्च पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे। पुढील तपास पोलिस निरीक्षक सुभाष चौहान करीत आहे।
विषेश म्हणजे आरोपीविरुद्ध कलम 353 ही पोलीस पाटील यांच्या स्वरक्षणार्थ विदर्भात प्रथमच लावण्यात आली आहे।