जनतेज न्युज

शिवसेनेतील दोन नेत्यांचा वाद आता कोर्टात

प्रतिनिधी , सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात शिवसनेतील अंतर्गत धुसफूस आता शिगेला पोहोचल्याचे पहायला मिळत आहे. कारण आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरूषोत्तम बरडे यांनी आपल्याचे पक्षाचे सोलापूर महानगरपालिकेतील नगरसेवक मनोज शेजवाल यांच्याविरूद्ध आब्रुनुकसानकीचा दावा दाखल केला आहे. हा दावा थोडा थोडका नसून तब्बल पाच कोटींचा दावा दाखल केला आहे. नगरसेवक शेजवाल यांनी माझ्याविरोधात
पत्रकार परिषद घेऊन खोटे आरोप केले आहेत. त्यामुळे माझी बदनामी होऊन माझी राजकीय कारकीर्द धोक्यात यावी तसेच माझी शिवसेनेच्या कार्यकर्त्यातील आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा विश्वास संपावा या हेतुने माझी मानहानी केली आहे. त्यामुळे मला प्रचंड मानसिक त्रास झाला आहे. त्यामुळे हा दावा दाखल केल्याचे जिल्हाप्रमुख बरडे यांनी सांगितले. तर ज्यांच्यावर हा दावा दाखल झालाय ते शिवसेना नगरसेवक मनोज शेजवाल यांनी मी सातत्याने ही गोष्ट बोलत राहणार. जिल्हाप्रमुखांनी माझा जीव घेतला तरी मी हेच बोलणार असल्याचे शेजवाल यांनी स्पष्ट केलेय. दरम्यान या घटनांमुळे सोलापूर शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आल्याचे पहायला मिळाले…