कोल्हापूर: विज बिल संदर्भात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांमध्येच वेगवेगळी वक्तव्य पहायला मिळते. देतो- नाही असं म्हणत राज्याची आर्थिक परिस्थिती नसल्याचे सांगतात. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकाच बैठकीत निर्णय घ्यावा. महाराष्ट्राच्या जनतेचा भ्रमनिरास करू नका आणि वीज बल संदर्भातील मदत ही राज्य सरकारला द्यावीच लागेल अशी ठाम भूमिका राजू शेट्टी यांनी मांडली.
स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सरकारचा घटक पक्ष असला तरी सामान्य जनतेवर आम्ही सोबत राहू, वेळ पडली तर रस्त्यावर उतरणार महाविकास आघाडी सरकारचा कोणताही अन्याय आम्ही सहन करणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला।
