कोरोनांच्या संसर्गागचा धोकामुळे महाशिवराञी निमित्त परिसरातील भाविकांची मंदिराकडे पाठ
जळगाव प्रतिनिधी :जळगा जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बु येथे दिडशे ते दोनशे वर्षापुर्वीचे महादेवाचे उत्कृष्ट शिल्पकला असलेले मंदिर असुन संपुर्ण परिसरात या मंदिराची मोठी ख्याती आहे.नवसाला पावणारा महादेव अशी या मंदिरातील मुर्तीची आख्यायिका आहे.प्राचिन काळी खडकदेवळा बु व खु हे गावे हिवरा नदीच्या काठी वसलेले होते.त्याकाळी हिवरा नदीला येणार्या सततच्या महापुरांना कंटाळुनच ग्रामस्थांनी खडकदेवळा बु गावाच्या प्रवेशव्दाराजवळच महादेव मंदिराची निर्मिती केली.या महादेव मंदिराचा गर्भागार सुमारे 15 बाय 15 फुट असुन मध्ये भागी गंडकीच्या काळ्या पाषाणाचे सुमारे पावणेदोन फुट उंचीचे शिवलिंग आहे.त्यावर 9 इंच व्यासाची सुमारे एक फुट उंचीची शिवसाळुंका ( पिंड ) आहे.या पिंडीवर वेढा दिलेली नागमुर्ति आहे. समोरच बैठकीवरच एक ते दोन फुट उंचीची नंदीची केसराची मुर्ति आहे. त्याच्या गळ्यात कोरलेल्या घुंगरु माळा ,घंटा पिठासन अत्यंत विलोभनीय आहे. मंदिरातील आकारबध्द मुर्ति शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. त्यामुळे या मंदिराच्या दर्शनासाठी परिसरातील असंख्य भाविक येथे येत असतात. श्रावण महिन्यात किर्तन ,प्रवचन,गीता पारायण,ज्ञानेश्वरी पारायण,काकडा आरती आदी प्रकाराची आध्यात्मिक मेजवाणी ग्रामस्थांना लाभते .मंदिराची देखरेख सेवानिवृत्त शिक्षक कै पांडुरंग गुरुजी करित होते .माञ त्यांचे निधन झाले आहे. या हिवरा नदीकाठी असलेल्या पुरातन महादेव मंदिराचे बांधकाम हे इ.स. 1847 मध्ये शिल्पकार सांडु श्यामजी बेलदार (रा.चिंचपुरे ) यांनी काळ्या दगडाने या मंदिराचे बांधकाम हे पुर्ण केले आहे.खडकदेवळा बु येथील पुरातन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या महादेवाच्या मंदिराची उंची ही सुमारे शंभर फुट आहे.या महादेव मंदिराचा उंच घुमट येणार्या भाविकांना आकर्षित करतो.व परिसरातुन दिसणारा हा घुमट खडकदेवळा गावाची ओळख दर्शवितो.दरवर्षी या ठिकाणी महाशिवराञी निमित्त याञा भरते माञ यंदाच्या वर्षी कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर हि याञा बंद करण्यात आली आहे.
प्राचीन निळकंठेश्वर महादेव मंदिर परिसर महाशिवराञीतही सुनेसुने
खडकदेवळा येथील हिवरा नदीच्या काठावर सुमारे दिडशे वर्षांपुर्वीचे प्राचीन निळकंठेश्वर महादेव मंदिर आहे. दरवर्षी महाशिवराञी मध्ये परिसरातील भाविकांची गर्दी येथे होत असते. यावर्षी माञ कोरोनाच्या भितीने सध्या भाविकांनी मंदिराकडे जाणार रस्ताच ‘लॉकडाऊन’ केला आहे. यामुळे यंदा महाशिवराञी असली तरी निळकंठेश्वर महादेव मंदिराकडे भाविकही दिसेनासे झाले आहे.
