शेतकर्यांमध्ये संताप,डिझेल पेट्रोल दर वाढल्याने यांञिक मशागतही महागली…
जळगाव प्रतिनिधी : खरीप हंगामाच्या तोंडावर सध्या जिल्ह्यात मशागतीचे कामे सुरू आहेत. गतवर्षी अति पाऊस व परतीच्या पावसामुळे खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतमालाला मिळणारा कमी भाव, यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच खरीप हंगामाच्या तोंडावर खताचे दर
सरासरी २५० रुपयांनी वाढल्याने
शेतकरयांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस,
तूर, सोयाबीन हरभरा,
मूग, ज्वारी, गहू आदी पिके घेतली
जातात. जिल्ह्यात बहुतांश जमिनी
कोरडवाहू असल्याने शेतकर्यांचे
अर्थचक्र खरीप हंगामावरच अवलंबून
असते.तर कही शेतकरी चे बागायत शेत जमीन असलेल्याने ते खरीप हंगाम व रब्बीच्या हंगामावर अवलंबून आहेत. गतवर्षी मूग,उडदावर आलेल्या व्हायरसमुळे नुकसान झाले.
त्यानंतर सततच्या पावसामुळे
सोयाबीन, ज्वारीचे व बोंडअळीमुळे
कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान
झाले. शेतकरी आर्थिक संकटात
सापडलेला आहे. असे असतानाही
मोठ्या हिमतीने शेतकरी येणार्या
खरीप हंगामाच्या तयारीत गुंतला आहे. ग्रामीण भागात नांगरणी, वखरणीची कामे सुरू आहेत. पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने यांत्रिक मशागतही महागली असल्याने शेतकरयांना आर्थिक भुर्दंड
सहन करावा लागत आहे. तसेच
दरवर्षी शेतीची अवजारे, बी-बियाणे
आणि रासायनिक खतांच्या किमती
वाढत आहेत. यंदा १ मार्चपासून खत
उत्पादक कंपन्यांनी खतांच्या दरात
प्रति ५० किलोच्या बँग मागे १७.३४
टक्के वाढ केली आहे. ही वाढ
शेतकरयांचे कंबरडे मोडणारी ठरत
आहे. उत्पादन खर्चानुसार शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर खताचे दर वाढल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.
इंधन वाढल्याने मशागतही महागली…
पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाल्याने ट्रैक्टरच्या साहाय्याने केली जाणारी मशागतही महागली आहे. सध्या डिझेलचे भाव गगनाला पोहोचल्याने शेतक्यांना नाहक आर्थिक भु्दड सहन करावा लागत आहे. खरीप हंगामाची पेरणी काही महिन्यांवर येऊन ठेपली
असताना सध्या ग्रामीण भागात नांगरणी, वरखरणीची कामे सुरू असून, शेतकरयांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
