प्रतिनिधी , सध्या राज्यात सर्वत्र या प्रकरणाची चर्चा आहे ती म्हणजे सचिन वाझे प्रकरण. या प्रकरणात रोज नवीन नवीन खुलासे समोर येत असतानाच आता स्कॉर्पिओ गाडी वर सचिन वाझे यांच्या हाताचे ठसे आढळून आले आहेत. असे एन आय ए यांच्याकडून समोर आले आहे. यावर आपली प्रतिक्रिया देताना भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले की 48 तास उलटूनही अजूनही सचिन वाझे यांचे निलंबन का नाही झाले व मुख्यमंत्री त्यांना पाठीशी का घालत आहे? सचिन वाझे त्यांना कायद्यासमोर जावेच लागेल.
यासोबतच आमदार अतुल भातखळकर यांनी माहिती दिली कआगामी महानगरपालिका निवडणुका लक्षात घेऊन भारतीय जनता पक्ष आता पुन्हा एकदा चौपाल कार्यक्रम सुरू करणार आहे.
