प्रतिनिधी , मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये एडवोकेट सतिष उके यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.
या आरोपात प्रामुख्याने नागपुरातील मोक्याची 300 कोटी रुपये किमतीची जमिनीकरिता आर्किटेक एकनाथ निमगाडे यांच्या खून प्रकरण याचा सुद्धा समावेश आहे.
तसेच विविध प्रकारात कोण धमकी देणे पोलिसांची जागा तसेच मंदिर व देवस्थानची जागा अडवून ते इतर आपल्या जवळच्या व्यक्तींना हस्तांतरित करण्यासारखे आरोप या वेळेस एडवोकेट सतिष उके यांनी भारतीय जनता पक्षाचे नेता व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केले.
पत्रकार परिषदेमध्ये सांगताना ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस ही त्यांची स्वच्छ प्रतिमा दाखवत असून ते जाणून-बुजून जनतेची दिशाभूल करत आहेत.
आपल्या वरील प्रकरणे बाहेर येऊ नये यासाठी ते सतत दुसरे प्रकरण लावून धरत आहेत
