सध्या लॉकडाऊन गरजेचा नाही – राजेश टोपे
प्रतिनिधी , जालना – कोरोना सुरु झाल्यापासून राज्यात आजपर्यंतची सर्वाधिक रुग्ण संख्या नोंदवण्यात आलीय.ही रुग्णसंख्या कमी करण्यासाठी ट्रॅकिंग,ट्रेसिंग आणि टेस्टिंगचं प्रमाण वाढवणार असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय. टोपे यांनी जालना जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.कोरोनाची रुग्णसंख्या कमी करण्यासाठी प्रशासनाने लावलेले निर्बधाचं पालन करणं गरजेचं असल्याचं देखील टोपे यांनी स्पष्ट केलं.
सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं लॉकडाऊनची चर्चा आहे मात्र सध्या राज्यासमोर लॉकडाऊन हा पर्याय नाही असं सांगत कोरोनावर मात करण्यासाठी आज राज्य सरकारकडे आवश्यक असलेल्या गोष्टी उपलब्ध असल्याचं सांगत राज्यात तूर्तास लॉकडाऊन गरजेचा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
