जनतेज न्युज

जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीठ..

प्रतिनिधी , बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात हवामान खात्याच्या वतीने 18 आणि 19 तारखेला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार शुक्रवारी रात्री मेहकर, चिखली
तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली.तर बुलढाणा,मोताळा, नांदुरा, मलकापूर आदी तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. गारपिटी मुळे शेतातील कांदा, भुईमूग, मूग, गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यासोबतच वादळी वाऱ्याने आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तर ग्रामीण भागातील बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला झाल्याने वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.