जनतेज न्युज

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण (RFO) यांची आत्महत्या….

प्रतिनिधी , मेळघाट : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव परिसरातील हरिसाल रेंज च्या RFO दिपाली चव्हाण यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून केलेल्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्य जीव परीक्षेत्रात त्या गेल्या दीड वर्षापासून RFO (वनपरिक्षेत्र अधिकारी) या पदावर कार्यरत होत्या,आज सायंकाळी साडे सात वाजता त्यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वर मधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची बातमी उघड होताच परिसरात खळबळ उडाली.गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याच विभागातील वरिष्ठ अधिकारी त्यांना त्रास देत असल्याचे बोलले जात आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचामुळेच आत्महत्या केल्याची चर्चा आहे,दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र रेंजर फॉरेस्ट असोसिएशन तसेच शिव सेना संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी यांनी केली आहे. दिपाली या गर्भवती होत्या त्यांच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.