प्रतिनिधी , नागपूर : नागपूर च्या जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीतील बाराखोली परिसरात रात्री 1 वाजता च्या दरम्यान तीन आरोपी आणि मृतक यांच्यात जुन्या भांडणावरून वाद झाला , आरोपी आशिष बागडे , मोनू सरदार आणि गोलू लांडगी यांनी मृतक शैलेश बोडले याला त्याच ठिकाणी मारहाण केली आणि आपल्या गाडी वर बसवून श्रवस्ती बुद्धविहार परिसरातील मैदानात घेऊन गेले त्या ठिकाणी सुद्धा त्याला जोरदार मारहाण करून जवळच असलेल्या विहिरीत फेकून दिले .. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शोध सुरू केला त्यावेळी जवळ च्या विहिरी जवळ मृतकांचे चपल दिसून आली त्यावरून फायर ब्रिगेड ला बोलावून शोध घेतला असता विहिरीत मृतदेह आढळला या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपी ना अटक केली तर एक फरार आहे
मृतक आणि आरोपी एकमेकांना ओळखणारे होते त्यांच्यात जुना वाद होता आणि तोच वाद या हत्येचं कारण ठरलं त्यामुळे नागपुरात हत्ते साठी मोठं कारण लागत नाही हे पुनः एकदा पुढे आल .
