प्रतिनिधी , अहमदनगर : पेट्रोल डिझेल ने दिवसेंदिवस सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे, पेट्रोल डिझेल बरोबरच गॅसचे ही भाव आज गगनाला भिडलेले आहेत, अशातच शेवगाव तालुक्यातील तळणी या गावातील ८३ वर्षाच्या कचरू आश्राजी झिंज या आजोबांनी शहराकडे येण्या-जाण्यासाठी तसेच शेतातून भाजीपाला घेऊन शहराकडे येण्यासाठी आता घोड्याचा टांगा उपयोगात आणला आहे, त्यामुळे आजोबांना आता वाढत्या पेट्रोलची काळजी राहिलेली नाही, टांग्यामध्ये आजोबांनी आरामदायी पुढची बसवून घेतली आहे, त्यामुळे त्यांचा प्रवास खूपच आरामदायी असल्याचे त्यांनी सांगितले, मानवाने कितीही प्रगती केली तरी मानव निर्मित आजारांनी आज मनुष्य त्रस्त झाला आहे, २१ व्या शतकातील प्रगतीच्या बढाया मारणाऱ्या भौतिक वाद्यांना मात्र परत एकदा ह्या आजोबांच्या टांग्या कडे पाहूअश्मयुग आची आठवण झाल्याशिवाय राहत नाही,
