जनतेज न्युज

देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत येण्याचं स्वप्न विसरुन जावं – हसन मुश्रीफ

प्रतिनिधी , कोल्हापूर : राष्टवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांना हात घातला. यावेळी त्यांनी रश्मी शुक्ला यांनी जो रिपोर्ट सादर केला होता. त्यातील बदल्या नियमानुसार होत्या अस सांगितले. तसेच रश्मी शुक्ला या अपक्ष आमदारांच्या संपर्कात होत्या आणि अनेक अधिकाऱ्यांना त्यांनी त्यासाठी कामाला लावलं होत. या आमदारांना त्या कोट्यवधी रुपयांची ऑफर देत होत्या. असा आरोप करत. पोलिस अधिकाऱ्यांचे हे कृत्य चुकीचं असुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीं त्यांच्यावर कडक कारवाई करावी असे आवाहन केले.
त्याच बरोबर देवेंद्र फडणवीस यांनी जो थयथयाट सुरू केला आहे. तो त्यांनी थांबवावा असे सांगत महाराष्ट्र राज्याची फडणवीस आणि रविशंकर प्रसाद यांनी माफी मागावी असेही ते म्हणाले. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत येण्याचं स्वप्न विसरून जावं. अंबानी यांच्या घरासमोर गाडी कुणी ठेवली? हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास भरकटवण्या यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे मुश्रीफ म्हणाले. एटीएस पथकाने दोन दिवसात या घटनेचा तपास लावला असता असंही ते म्हणाले.
मंत्र्याने फोन टॅपिंग करण्याची परवानगी कुंटे यांनी दिली नसल्याचे सांगत, शुक्ला यांनी मिळालेल्या परवानगीचा गैर वापर केला आहे. असा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर केला तसेच राज भवन हे भाजपचे कार्यालय झालं असल्याची बोचरी टीका ही यावेळी त्यांनी केली. ते कोल्हापूरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते