जनतेज न्युज

शेतक-र्याचा भारत बंद ला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षा सह विविध संघटनेच्या पाठिंबा….

प्रतिनिधी ,नंदुरबार : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व पुरोगामी पक्षाच्यावतीने नंदुरबार तालुका कमिटीच्यावतीने विविध मागण्या संदर्भात तसेच शेतकरीं चा भारत बंद ला पाठिंबा देण्यासाठी आज तहसीलदार यांना निवेदन देण्यात येऊन केंद्र सरकार विरोधात घोषणा देऊन आन्दोलन करण्यात आले …
गेल्या ०४ महिन्यांपासून दिल्लीच्या बॉर्डरवर किसान आंदोलन करीत आहेत. त्यांच्या मागण्या मंजुर न करता
आंदोलनकर्त्यांवर खोटे आरोप करुन खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे . लोकशाहीला धाब्यावर बसवुन कोरोना काळात केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन काळे कायदे केलेले आहेत. तसेच कामगार, शेतमजुर, कर्मचारी विरोधी ०४ श्रम संहिता कायदा करुन त्यांचे हक्क हिरावून घेतले गेले आहे.तसेच २०२० वीज विधेयक मंजुर करुन खाजगी कंपनीला भरमसाठ विजेचे बिल आकारण्याची मुभा देण्यात आली आहे. केंद्राचे सरकार शेतकरी, शेतमजुर तसेच कर्मचारी विरोधी कायदा करुन बडे भांडवलदार, कार्पोरेट राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय उद्योगपतींना देशाची सार्वजनिक संपत्ती बहाल करीत असून खाजगीकरणाचे धोरण अवलंबुन देशातील श्रमिक जनतेला गुलाम बनविण्याचे कारस्थान करीत आहेत.
तसेच जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव कमी असून मात्र देशात डिझेल, पेट्रोलचे भाव व गॅसचे भाव वाढवुन सर्वसामान्य जनतेला महागाईत ढकलत आहेत. वरिल सर्व काळे कायद्यांविरोधी आज भारत बंदचा कार्यक्रमाला आमचा पूर्ण पाठींबा देण्यासाठी आज मास्कवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी नथू साळवे सनु मणिलाल भील, आप्पा वाघ, बाळासाहेब ब्राह्मणे, दीपक भालेराव, शिवराम भील आदी उपस्थित होते …