जनतेज न्युज

मोझरी येथील महिलांची वीज कार्यालयावर धडक… वीज भरण्यासाठी पैसे नसल्याने अभियंताला दिले मंगळसूत्र..

प्रतिनिधी , अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील दलित वस्ती भागात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या घराची विज लाईन कट केल्याने संतप्त झालेल्या महिलांनी युवा संघर्ष संघटनेच्या नेतृत्वात तिवसा वीज वितरण कार्यालयावर धडक दिली,यावेळी हात मजुरी वर कुटुंबाचा उदरनिर्वाह असल्याने हजारो रुपय विज बिल भरण्याची परिस्थिती नसल्याच्या कारणाने महिलांनी गळ्यातील मंगळसूत्र अभियंता यांच्या टेबलवर ठेवून आक्रमक पवित्रा घेतला…
कोरोनाच्या काळात झालेल्या लोक डॉन परिस्थितीमध्ये सर्वसामान्य कुटुंबाचे मोठे हाल झाल्याचे चित्र सर्वत्रच पहायला मिळाले अनेकांनी या काळात आपला रोजगार गमावला आहे तेव्हा याच का विद्युत विजेचा वापर सर्वाधिक झाला असल्याने कोरोनाच्या काळात बिलाचा भरणा न झाल्याने अनेकांना कितीतरी महिन्याचे विज बिल आले आहे.त्यामुळे हजारो रुपयांचे बिल भरने सर्वसामान्य लोकांना अशक्य असून यामध्ये सवलती देण्याची मागणी लोकांकडून अधिकच होताना दिसत आहे तर मोझरी येथील दलित वस्ती भागात हातावर मजुरी असणाऱ्या लोकांची संख्या अधिक असून या लोकांचा उदरनिर्वाह बँड बाजा, झाडू,घरातील भांडी कुंडी धुवून होतो या मजुरीतूनच येथील कुटुंब आपल्या संसाराचा गाडा चालवतात, मात्र या लोकांच्या घरातील वीज आज महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कट केल्याने महिलांनी कर्मचाऱ्यां समोर हात जोडीन विनंती केली असताना कुठलेही कर्मचाऱ्यांने महिलांचे ऐकून न घेता वीज कट केली तेव्हा संतप्त झालेले महिलांनी तिवसा येथील महावितरण कार्यालय गाठून त्या ठिकाणी कार्यकारी अभियंता यांच्या दालनात ठिय्या देत वीज बिलात टप्पे पळून देण्याची मागणी केली, अन्यथा गळ्यातील मंगळसूत्र कार्यालयात वीज बिल भरे पर्यंत ठेवून कट केलेली विज सुरू करण्याची मागणी देखील यावेळी महिलांनी केली.