जनतेज न्युज

डोंबिवलीत धक्कादायक प्रकार…कोविड सेंटर परिसरातच कर्मचा : यांची दारु व चिलम पार्टी ….. व्हीडीओ करुन मज्जाव करणा : यास केली बेदम मारहाण पार्टी करणा : यांना कामावरुन काढले… व्यवस्थापनाची कारवाई…

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : चोरी, महिलांसोबत गैरवर्तन आणि आत्ता कोविड सेंटर परिसरात कोविड सेंटरमध्ये काम करणा:या कर्मचा:यांची दारु पार्टीचा व्हीडीओ समोर आला आहे डोंबिवलीतील महापालिकेच्या सावळाराम क्रीडा संकुलातील कोविड सेंटरमध्ये हा प्रकार घडला. दारुडय़ांचा व्हीडीओ काढत पार्टीसाठी मज्जाव करणाऱ्या तरुणाला मद्यधुंद कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन केली बेदम मारहाण . व्हिडीओ वायरल होताच पार्टी करणा:या कर्मचा:याना कामावरु नकाढून टाकले असल्याचे व्यवस्थापनाने सांगितले आहे.
व्हीओ :- कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रत कोरोना रुग्णांची संख्या 75 हजाराच्या घरात गेली आहे. सध्या वाढत असलेली रुग्ण संख्या महापालिका आणि नागरीकांसाठी चिंतेची बाब आहे. हे सर्व सुरू असताना एक लाजीरवाणी घटना समोर आली आहे.
डोंबिवली परिसरातील कोरोना रुग्णाचा उपचार होण्यासाठी महानगर पालिकेचा डोंबिवलीत महापालिकेच्या सावळाराम क्रीडा संकुलात कोविड सेंटर आहे. महापालिकेच्या हा कोविड सेंटर खाजगी कंत्रटदाराकडून चालविले जाते. या कोविड सेंटरमध्ये अनेक कर्मचारी काम करतात. कोविड सेंटरच्या लागून असलेल्या एका ठिकाणी सेंटरमध्ये काम करणा:या टेक्नीनिशीयन साठी मंडप वजा तंबू तयारकरण्यात आला आहे. मात्र त्या ठिकानी दररोज सेंटरमधील कर्मचारी बसून
चरस ,गांजा , चिलीम व दारु पार्टी करतात . शनिवारी सुद्धा अशीच दारु व चिलीम पार्टी सुरु होती. पार्टी दरम्यान कोविड सेंटरमध्ये एसीचे काम करणारा राजू आलम या तरुणाने दारु पार्टी करणा:या कर्मचा:यांचा व्हीडीओ काढत मज्जाव केला. तसेच त्याने त्यांना डॉक्टरांनी इथे काही करण्यास मनाई केली असल्याचे सांगितले. इतकेच सांगताच कोविड सेंटर परिसरातच दारूची पार्टी करणारे संतोष पिटय़ा नावाच्या काही तरुणांनी राजू आलम याला बेदम मारहाण केली. सध्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सेंटर चालविणारे राहूले यान्हा विचारले असता त्यांही संबंधित कर्मचा:यांना कामावरुन काढून टाकले असल्याचे सांगितले असून
या वर सुरक्षा यंत्रणोचे लक्ष असते असे सांगितले मात्र कॅमेऱ्या समोर बोलण्यास नकार दिला .