प्रतिनिधी , बुलडाणा : बुलडाणा तालुक्यातील हतेडी या गावांमध्ये एक एक महिना नळाला पिण्याचे पाणी येत नसून संतप्त झालेल्या महिलांनी अखेर आज आपला रोष व्यक्त करत ग्रामपंचायतला कुलूप ठोकले आहे.हतेडी गावांमध्ये जलस्वराज्य योजना त्याचबरोबर इतरही योजना मंजूर असून देखील ग्रामपंचायत कडून एक एक महिना गावाला ग्रामपंचायत कडून पाणीपुरवठा केला जात नाही,त्यामुळे गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून गावातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, महिलांनी मजुरी करावी की पाण्यासाठी भटकंती करावी असा प्रश्न उपस्थित करत आज गावातील संपूर्ण महिला एकत्र येऊन
ग्रामपंचायत तर मोर्चा काढत ग्रामपंचायत ला कुलूप ठोकले आहे.किमान आठ दिवसांनी तरी नळ यावे अशी मागणी महिलांनी केली आहे..
