प्रतिनिधी , सोलापूर : उपमहापौर राजेश काळे यांना विजापूर नाका पोलिसांनी अटक केली आहे.
मित्राची वीज का कापली याचा जाब विचारण्यासाठी महावितरणच्या कार्यकर्त्याला राजेश काळेंनी रात्री 8 च्या सुमारास केली होती मारहाण.
वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज कनेक्शन तोडल्याने उपमहापौर काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोटणीस नगर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे.
याप्रकरणी विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरा राजेश काळे आणि इतरांवर 6 जणांविरुद्ध महावितरण कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून कलम 353 नुसार गुन्हा दाखल झाला आहे
या अगोदर देखील उपमहापौर काळे यांनी उपायुक्तांना शिवीगाळ केल्याप्रकरणी अटक झाली होती.
दरम्यान उपमहापौर आरोपी राजेश काळे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता पोलीस काळेंच्या तडिपारसंदर्भात प्रस्ताव तयार करत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
