प्रतिनिधी , अमरावती : अमरावती मधील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरिसाल ट्रेनच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी काल सायंकाळी Dfo विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून सर्व्हिस रिव्हॉल्वर मधून गोळी झाडून आत्महत्या केली या प्रकरणात मुख्य आरोपी विनोद शिवकुमार मुख्य वनसंरक्षक एम एस रेड्डी यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करावी या मागणीसाठी सकाळपासूनच अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृह समोर विविध सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व कुटुंबीयांनी तसेच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.अजूनही हे आंदोलन सुरूच आहे.दरम्यान पळून जाण्याचा बेतात असलेल्या dfo विनोद शिवकुमार याला नागपूर येथून अटक केल्याची माहिती पोलिस अधीक्षक यांनी दिली.मात्र रेड्डी यांच्यावर चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल करू अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ हरी बालाजी यांनी दिली.मात्र नातेवाईक अजूनही आक्रमक असून आपल्या मागणीवर ठाम आहेत…
