जनतेज न्युज

विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये(तळ+४) दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात लागली आग

प्रतिनिधी , मुंबई : आज दिनांक २३/०४/२०२१ रोजी रात्रौ ०३:१३ वाजताच्या सुमारास तिरुपती नगर, बंजारा हॉटेलच्या मागे, विरार(प.) येथे विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये(तळ+४) दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात आग लागली होती सदर घटनास्थळी विरार अग्निशमन दलाचे ०३-फायर वाहन उपस्थित होते. सदरची आग अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून पहाटे ०५:२० वा. सुमारास विझवली आहे. सदर घटनेत १३ रुग्णांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झालेला असून ५ ते ६ रुग्णांना पुढील उपचारासाठी इतर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे असे विरार अ. केंद्रातून मिळालेल्या माहितीनुसार अद्ययावत.
सदर घटनेत मृत झालेल्या व्यक्तीची माहिती पुढीलप्रमाणे:-
१) श्रीमती. उमा सुरेश कंगुटकर, (स्त्री/वय वर्ष ६३)
२) श्री. निलेश भोईर, (पु/वय वर्ष ३५)
३) श्री. पृथ्वीराज वल्लभदास वैष्णव, (पु/वय वर्ष ६८)
४) श्रीमती. रजनी कडू, (स्त्री/वय वर्ष ६०)
५) श्री. नरेंद्र शंकर शिंदे (पु/वय वर्ष ५८)
६) श्री. जनार्दन मोरेश्वर म्हात्रे (पु/वय वर्ष ६३)
७) श्री. कुमार किशोर दोशी (पु/वय वर्ष ४५)
८) श्री. रमेश उपयान (पु/वय वर्ष ५५)
९) श्री. प्रवीण शिवलाल गौडा (पु/वय वर्ष ६५)
१०) कु. अमेय राजेश राऊत (पु/वय वर्ष २३)
११) श्रीमती. शमा अरुण म्हात्रे (स्त्री/वय वर्ष ४८)
१२) श्रीमती. सुवर्णा पितळे (स्त्री/वय वर्ष ६४)
१३) श्रीमती. सुप्रिया देशमुख (स्त्री/वय वर्ष ४३)