प्रतिनिधी , जळगाव : जिल्हा पोलिसांच्या वतीने मागील तीन महिन्यापासून जिल्ह्यामध्ये बेवारस पडलेल्या वाहनांच्या निर्गती व त्याची मोहीम राबवण्याचे आदेश जिल्हाभरातील 35 पोलीस स्टेशनला देण्यात आले होते एक लांबलचक प्रक्रिया होती सुरुवातीला त्यांच्या याद्या बनवून त्याची प्रसिद्धी देण्यात आली ज्या बेवारस मालकांच्या शोध लागला त्यांना ती सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहने परत करण्यात आली जळगाव शहरातील सब डिव्हिजन मधील सहा पोलीस स्टेशन चा बेवारस गाड्यांचा लिलाव आज करण्यात आला यामध्ये 182 वाहनांचा निलाव आज करण्यात आला सात लाख 59 हजार रुपये शासनाच्या तिजोरीत या लिलावातून भरण्यात आले व ही वाहने जवळजवळ वीस वर्षापूर्वी पासून पोलीस स्टेशनच्या आवारात बेवारस पडून असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी दिली आहे
