जनतेज न्युज

पिंपरी – चिंचवड शहरातील थेरगाव परिसरात मॅग्नेशियमची पावडर बनवणाऱ्या कंपनीत आज दुपारी भिषण स्फोट झाला आहे.

पुणे , पिंपरी – चिंचवड : स्फोट एवढा भिषण होता की स्फोटाच्या धक्क्याने आजूबाजूच्या काही घराच्या भिंतींना तडे गेले आहेत. स्फोटानंतर लागलेल्या आगीत मॅग्नेशियम पावडरने पेट घेतला. मात्र ही आग विझविण्यासाठी पाण्याचा वापर करता येत नसल्याने आग विझेपर्यंत अग्निशमन दलास प्रतिक्षा करावी लागणार आहे. या स्फोटात कोणतीही जीवित हानी झाली नसून कंपनीच मोठं आर्थिक नुकसान झालं आहे