जनतेज न्युज

धक्कादायक ! ऍडमिट पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाचा सिद्धार्थ नगरात मृत्यू.. पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद.. नातेवाईकांनी पटवली ओळख

प्रतिनिधी , अमरावती : अमरावती जिल्ह्यातील आजनगाव येथील 65 वर्षीय किसन झोरे नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला अमरावती येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.. हा रुग्ण 25 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता दरम्यान अमरावती शहरातील सिद्धार्थनगर परिसरात पोलिसांना मृतावस्थेत आढळला.. पोलिसांनी पंचनामा करून आकस्मित मृत्यूची नोंद घेतली.. आज नातेवाईकांनकडून ओळख पटल्यानंतर हा रुग्ण पॉझिटिव्ह वार्ड मध्ये असताना बाहेर कसा आला. हा प्रश्न उपस्थित झाला आहे..नातेवाईकांच्या ओळख पटल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे..
अमरावती जिल्ह्यातील आजणगाव येथील 65 वर्षीय नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.. नातेवाईकांनी त्यांना उपचारार्थ अमरावती येथील सुपर स्पेशालिटी येथे 22 एप्रिल रोजी भरती करण्यात आले. त्यानंतर पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरू झालेत..24 एप्रिल रोजी हाच रुग्ण अमरावती शहरातील गडगेनगर पोलीसांच्या हद्दीत असलेल्या सिद्धार्थनगर परिसरात मृतावस्थेत आढळला. पोलिसांनी ओळख पटविण्यासाठी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधून पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदन गृहात पाठविला.. 25 फेब्रुवारीला नातेवाईकानी ओळख पटविल्यानंतर सदर रुग्ण हा पॉझिटिव्ह असून सुपर स्पेशालिटी येथे उपचार घेत असल्याचे पोलिसांना सांगितले.. यावरून हा धक्कादायक प्रकार समोर आलाय