प्रतिनिधी , सांगली : कृष्णा नदीची पाण्याची पातळी आणखी दहा फूट आणि वाढण्याची शक्यता आहे सकाळी आयर्विन पूल आजची पाण्याची पातळी 39 फूट होती, त्यात आणखीन दहा फूट पाणी वाढण्याची शक्यता आहे. आयुर्विन पूलाची धोका पातळी 45 फूट असून दुपारपर्यंत पुराचे पाणी धोका पातळीच्या वर जाण्याची शक्यता आहे.
2019 च्या महापुराच्या कटू आठवणी लक्षात घेता यंदा लोकांनी अगोदरपासूनच खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. ज्या ज्या ठिकाणी पुराचे पाणी येऊ शकतं तेथील लोक अगोदरच अन्य ठिकाणी स्थलांतरित होत आहेत.
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून लोकांना वेळोवेळी योग्य त्या सूचना दिल्या जात आहेत. त्यांचं स्थलांतर आणि तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात येत आहे अशी माहिती सांगली महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी माहिती दिली.
